जुन्या मुंबई मधील रस्त्यावरचे दृश्य   
एकोणिसावे शतक
जलरंगातील चित्राचा शिळाछाप

एडवर्ड हिल्डरब्रॅन्ट, १८१८-१८६९, हे नावाजलेले जर्मन चित्रकार होते; ज्यांनी १८६०-६२ मध्ये जगाची सफर केली. ह्या प्रवासात मध्य पूर्व, आशिया आणि संयुक्त राष्ट्रांचा समावेश होता. ते मुख्यतः जलरंगात काम करत असत. त्यांच्या जगाच्या सफरीतील चित्रांचा अनुक्रमित संचय रंगीत शिळाछापांच्या रूपात १८६४ मध्ये बर्लिन येथे प्रकाशित झाला. मूळ जलरंगातील चित्रं १७६४ मध्ये लंडन येथे प्रदर्शित झाली आणि नंतर १८६८ साली क्रिस्टल पॅलेस येथील प्रदर्शनात दाखवली गेली.

सदर चित्रात मुंबईतील एका उच्चभ्रू घराचा भाग दिसतो. मोठा रुंद रस्ता, लाकडी ओसरी आणि विस्तृत दर्शनी भाग असलेल्या घरांवरून त्यांची समृद्धी जाणवते.