ग्रोसचा बॉम्बेचा आराखडा
१७५०
कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२

जॉन हेनरी ग्रोस हे लेखक आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सनदी कर्मचारी होते. १७५० साली ईस्ट इंडिया कंपनीकडून ते मुंबईला आले आणि त्यांचे अनुभव १७७२ साली 'पूर्व इंडिजच्या सफरीं' नावाने दोन भागात प्रकाशित केले गेले. हा आराखडा अमूल्य आहे कारण मुंबई किल्ल्याच्या तटबंदीमधील प्रत्येक रस्ता ह्यात मांडलेला आहे, शिवाय जोडीला फुटाचे मापक सुद्धा दिले आहे.

संग्रहालयाचा मुंबईच्या ऐतिहासिक नकाशांचा संचय ह्या शहराची सात बेटांपासून १९साव्या शतकात एका प्रभावी नागरिक केंद्रात झालेली उत्क्रांती चित्रित करतो. त्याचबरोबर आक्रमणांमुळे झालेले भौगोलिक बदल, आर्थिक भरभराट आणि नियोजनाचे इतिवृत्त देतो.