हेप्टानेशिया
(ईसवी सन १२९४-१६६२)
उत्थित नकाशा

सात बेटांच्या मुंबईच्या मुळ त्रिमित नकाशाचे नाव सात बेटांचा समूह, अर्थात ग्रीक भाषेत हेप्टानेशिया, असे ठेवण्यात आले; टोलेमीच्या लेखनातून ज्ञात असलेले हे ह्या शहराचे सर्वात प्राचीन नाव. जलमय, दलदलीचा आणि खारफुटींनी विभक्त असलेला, नारळीच्या झाडांनी व्यापलेला, बेटांच्या समूहाचा प्रदेश ते एकोणिसाव्या शतकातील शोभिवंत शहरात झालेले मुंबई शहराचे परिवर्तन कमलनयन बजाज मुंबई कलादालनात दाखवले आहे.