गाळउपसणी यंत्र 'कुफूस' ची प्रतिकृती
१९१४
लाकूड आणि धातू

'कुफूस' नामक गाळउपसणी यंत्राची ही प्रतिकृती १९१४ साली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी संग्रहालयाला भेट दिली. हे मोठाली यंत्र समुद्राच्या किनाऱ्याजवळील भागातून गाळ उपसण्यासाठी, आणि नंतर इतर अनेक कार्यांसाठी वापरली जाई. मुंबई मध्ये ह्या यंत्रांचा वापर मुख्यतः समुद्र मागे हटवून जमीन बनवण्यासाठी केला गेला आणि वाहतूक, गृहनिर्माण व व्यापारासाठी मोठाल्या लांबवर पसरलेल्या जमीनी उपलब्ध झाल्या.