विकासानंतर वरळी परिसराची प्रतिमा
१९४०
उत्थित नकाशा

वरळीच्या वसाहतींचा विकासानंतरचा हा उत्थित नकाशा, गिरण्यांच्या स्थापनेनंतरची वरळी परिसराची रचना दाखवतो. ह्यात गिरण्या आणि कामगारांची निवासस्थाने स्पष्ट दिसतात. येथील गर्द निवासी इमारती, स्थलांतरितांचा गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी मुंबईकडे येण्याचा ओघ प्रतिबिंबित होतो.

संग्रहालयाचा मुंबईच्या ऐतिहासिक नकाशांचा संचय ह्या शहराची सात बेटांपासून एकोणिसाव्या शतकातील एका प्रभावी नागरि केंद्रात झालेली उत्क्रांती चित्रित करतो. त्याचबरोबर आक्रमणांमुळे झालेले भौगोलिक बदल, आर्थिक भरभराट आणि नियोजनाचे इतिवृत्त देतो.