प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन दालन, मुंबईचे उगमदालन
सकाळी १०:०० - सायंकाळी ५:३०
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, मुंबई, गथं इन्स्टिट्यूट / मॅक्स म्युलर भवन, मुंबई यांच्या सहकार्याने, ‘परिदृश्यातील प्रयोग’ हे प्रदर्शन सादर करताना आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम कलाकार, संगीतकार आणि नाट्यनिर्माते हैनर गोबल्स यांचे भारतातील हे पहिले एकल प्रदर्शन आहे. त्यांच्या आंतरशाखीय कलाप्रयोगांसाठी ते ओळखले जातात, आणि अनेक दशकांच्या कालावधीत त्यांनी बहुस्वरात्मक रचनांचा समावेश असलेला, वैशिष्ट्यपूर्ण कलाभाषेत साकारलेला एक व्यापक कलासंच घडवला आहे.
या प्रदर्शनाचे शीर्षक प्रायोगिक अमेरिकन लेखिका गर्ट्रूड स्टाइन. (१८७४–१९४६) यांनी मांडलेल्या संकल्पनेवर आधारित आहे. त्यांनी पारंपरिक कथानकाच्या रचनेपासून दूर जाणाऱ्या नाट्यरूपाची मांडणी केली होती. स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट असलेली कथा सांगण्याऐवजी, स्टाइन यांनी नाट्यप्रयोगांना भूप्रदेशाप्रमाणे उलगडणारे—मुक्त वातावरणांनी भिन्न स्तर असलेले—असे कल्पिले, जिथे प्रेक्षकांना स्वतःचे केंद्रबिंदू निश्चित करण्याचे स्वातंत्र्य असते. याच भावनेत, गोबल्स यांच्या कलाकृती नाटक आणि दृश्यकलेतील सीमारेषा विरघळवतात आणि प्रेक्षकांना ध्वनी, प्रकाश, वस्तू आणि हालचाल यांचा अवकाशात समसमान नायक म्हणून अनुभव घेऊ देतात.
‘परिदृश्यातील प्रयोग’ हे संग्रहालयाच्या प्रदर्शनस्थळात साकारलेले एक सूक्ष्मरित्या रचलेले ध्वनीक्षेप आहे, ज्यामध्ये प्रत्येक खोली ही वेगवेगळ्या गतिमान प्रतिमा आणि ध्वनीकेंद्र प्रदान करते. तरीही, कोणताही एक घटक इतरांवर वर्चस्व गाजवत नाही; उलट, संकल्पना, वस्तू, क्रिया आणि ध्वनी यांचे सौंदर्यपूर्ण सुसंवादात संयोजन केलेले आहे. संपूर्ण प्रदर्शनात, प्रेक्षकांना विविध दृश्यांचा सामना होतो—भूतकाळातील अवशेषांना ओढत नेणाऱ्या कलाकारांचे बदलते रेखाटन, मानवी कलाकारांशिवाय उलगडणारी यांत्रिक घटकांची नृत्यरचना, किंवा मेंढ्यांच्या कळपावर दबा धरून असलेले एक झेपेलिन. अशा दृश्यांमधून सामूहिक स्मृती, सत्ताकेंद्रे, निगराणी, आणि मानवी अनुभव घडवणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांवर सूचक भाष्य केले जाते; परंतु या कलाकृती एकाच निश्चित अर्थाकडे निर्देश करत नाहीत. त्याऐवजी, प्रेक्षकांना या अवकाशात थांबून, लक्षपूर्वक निरीक्षण आणि श्रवणाच्या माध्यमातून स्वतःचे अर्थ शोधण्याचे आमंत्रण दिले जाते.
संग्रहालयाच्या संग्रहातील मुंबईच्या ऐतिहासिक छायाचित्रांसोबत सादर केलेली त्यांची नवीन कलाकृती, ‘ईगल्स’, शहराच्या आकाशरेषेवर वर्तुळाकार फिरणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करते. त्यांच्या हालचाली क्षितिजावर शांत लय उमटवतात आणि शहराच्या भू-दृश्य व स्मृती घडवणाऱ्या बदलत्या काल-अनुभूतींवर चिंतन करण्यास आमंत्रित करतात. अनेक स्तरांच्या इतिहासांनी आणि सांस्कृतिक कथांनी घडलेल्या या संग्रहालयाच्या संदर्भात ही कलाकृती अर्थपूर्ण प्रतिसाद घडवते.