प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
विशेष प्रकल्प दालन
सकाळी १०:०० - सायंकाळी ५:३०
कापड खरेदीच्या हेतूने तुम्ही जणू १९व्या किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या भारतातील गजबजलेल्या बाजारात प्रवेश करता. कापड खरेदी करताना आजूबाजूला पाहताच ! एक गोष्ट तुमचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे बहुतेक कापडाच्या गठ्ठ्यावर लावलेले चकचकीत, रंगीबेरंगी कागदी लेबल. प्रत्येक लेबलावर वेगवेगळे चित्र असते. हसवणारा नाचणारा हत्ती, भक्ती जागवणारी ओळखीची देवताची प्रतिमा, हिरवळीने भरलेल्या बागेत विसावलेली स्त्री जी मनात विरहाची भावना जागवते, किंवा दूरदेशांची स्वप्ने दाखवणारे वाफेचे जहाज असे विविध प्रतिमा पाहायला मिळतात. ही चित्रे फक्त सजावटीसाठी नसून, त्या काळातील कल्पना, श्रद्धा आणि इच्छा व्यक्त करत होती.
ही लेबले किंवा कापडाची तिकिटे यांना ‘टीकिट’, ‘टिका’ किंवा ‘छाप’ असेही म्हटले जाते. ही ब्रँडिंग आणि जाहिरातींची सुरुवातीची रूपे होती. ब्रिटिश आणि नंतर भारतीय गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या सुती कापडावर ही तिकिटे मोठ्या प्रमाणात लावली जात होती. असे कापड भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत विकले जात होते.
उपखंडातील मोठ्या प्रमाणावर छापल्या गेलेल्या रंगीत जाहिरातींपैकी ही कापडाची लेबले सुरुवातीची उदाहरणे होती. कापडाच्या सामान्य खरेदीतही ती इच्छा निर्माण करत, आठवणी जागवत आणि अर्थ भरून देत असत. या लेबलांच्या रचनेत अनेकदा माहिती देणारी कड असे आणि त्यावर उठावदार चित्रे होती. देवतांच्या प्रतिमा, पौराणिक प्रसंग, राजेशाही व्यक्तींची चित्रे, राजकीय चिन्हे किंवा कधी कधी मजेशीर दृश्येही. ही चित्रे स्थानिक आवड, सौंदर्य र्यदृष्टी आणि लोकांच्या आकांक्षांशी जुळतील अशी निवडलेली होती. या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे ग्राहकांचे लक्ष वेधणे, त्या ब्रँडबद्दल विश्वास आणि ओळख निर्माण करणे, आणि कापडाची गुणवत्ता चांगली आहे अशी भावना मजबूत करणे.
क्रोमोलिथोग्राफ (रंगीत दगडी छपाई) या नवीन छपाई तंत्राचा वापर करून ही कापडाची लेबले तयार केली जात होती. या तंत्रामुळे रंगीत चित्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आणि दैनंदिन खरेदीचा अनुभव अधिक आकर्षक व डोळ्यांना आनंद देणारा झाला. अनेक लोकांसाठी ही लेबले केवळ व्यापारापुरती मर्यादित राहिली नाहीत. ती जपून ठेवण्यासारखी संग्रहाची वस्तू, भक्तीची चिन्हे किंवा स्वतःच्या आवडी-निवडी आणि आकांक्षांचे प्रतीक बनली गेली.