प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
विशेष प्रकल्प दालन, संग्रहालयाचं प्रांगण
सकाळी १०.०० - संध्याकाळी ०५.३०
मोफत प्रवेश
सदर प्रदर्शन अन्नु पालाकुन्नथु मॅथ्यु यांच्या गेल्या तीन दशकांतील आठ महत्वपूर्ण कलाकृती प्रस्तुत करतं. उकल सवड मागते (मायनर मॅटर्स / सिपिया आय, २०२२) हे मॅथ्यु यांच्या आजवरच्या कलानिर्मितीचा आढावा आपल्यापुढं प्रस्तुत करतं. ते त्यांच्या कलाकृती आणि कलाप्रवास अनुभवण्याची संधी बहाल करतं. छायाचित्रण, कोलाज, ॲनिमेशन आणि व्यंगचित्रणाच्या वापरातून आकाराला आलेल्या कलाकाराच्या वैचारिक बैठकीचं वृत्त मांडताना, सदर प्रदर्शन सांस्कृतिक ओळखीचा माग, त्याला दिलेलं सादरीकरणाचं कोंदण, आणि त्याच्याशी जोडलेले तरल पदर उलगडू पाहतं. ओळख सांगताना व अनुभवताना स्वत:ला आणि इतरांना आलेल्या अनुभवांच्या गोष्टी मॅथ्यु सांगतात. जरी त्यांनी आपल्या कारकीर्दची सुरुवात एक सिद्धहस्त स्थिरचित्रं टिपणाऱ्या छायाचित्रकार म्हणून केली असली, तरी त्यांनी आपल्या कलासाधनेच्या कक्षा विस्तारत, स्थिर प्रतिमा, चलचित्रं आणि ध्वनी यांचा अनोखा समन्वय साधत, रसिकांसाठी एक अनोखा अनुभव गुंफिला. त्यांच्या कलाकृती अनेकदा गतकालीन छायांचित्रांच्या संग्रहांवर बेतलेल्या दिसतात, त्या त्यांवरुन प्रेरणा घेतात, आणि ऐतिहासिक कथानकांचा आणि वसाहतवादाच्या वेढ्याचा पुनर्वेध घेतात.
मॅथ्यु यांच्या कलाकृतींची दखल आतंरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, त्यांचा समावेश नामांकित संस्थांनी आयोजित केलेल्या महत्वाच्या प्रदर्शनांत करण्यात आला आहे. त्यांच्या कलाप्रांतातील दायित्वाला असलेलं वैश्विक महत्व हेच ह्या निवडीमागचं कारण. त्यांची रॉयल ऑन्टॅरिओ म्युझियम, न्यूपोर्ट आर्ट म्युझियम आणि नुई ब्लांच टोरांटो येथे एकल प्रदर्शनं आयोजित करण्यात आली आहेत. निवडक समूह प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृती दाखवण्यात आल्या आहेत, ज्यांत रिस्ड म्युझियम; बोस्टनमधील म्युझियम ऑफ फाईन आर्टस्; म्युझियम ऑफ फाईन आर्ट ह्युस्टन; सॅन होजे म्युझियम ऑफ आर्ट; व्हिक्टोरिया अँन्ड अल्बर्ट म्युझियम; स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट; नॉरडर्लिक्ट फोटो फेस्टिव्हल; ले मुआ दे ला फोटो अ मोन्ट्रीएल फोटो बिएनाले; कोची - मुझिरिस बिएनाले; आणि ग्वांगझू फोटो बिएनाले यांचा समावेश होतो.