सिंधचे लाखकाम
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
लाखेचा मुलामा असलेले लाकूड

एकोणिसाव्या शतकातील सिंध येथील लाखेच्या कलात्मक वस्तूंचा एक उत्कृष्ट संचय संग्रहालयाकडे आहे. लाकडी वस्तूंवर लिंपण्यासाठी रंगीत लाख तयार करण्याची प्रक्रिया लांबलचक आणि कष्टाची आहे. क्लिष्ट तंत्रांचा वापर करून विविध प्रकारच्या रचना, जसे आब्रि (ढगांचे काम), अतिशी (फटाके) आणि नक्षी, ह्यांची निर्मिती केली जात असे.