चांदीचे काम करणारे कारागीर
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
अर्धी भाजलेली टेराकोटा माती, रंगद्रव्यांसहित

संग्रहालयात मातीच्या प्रतिमांचा अद्वितीय संचय आहे ज्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतची मुंबईची माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती दर्शवलेली आहे. ह्या संचयात पारंपरिक हस्तकला आणि व्यवसायांचा सराव करतानाच्या कारागिरांच्या प्रतिमांचा समावेश आहे. सदर प्रतिमा चांदीचे काम करणाऱ्या कारागिराची आहे, त्याच्या आसपास त्याची अवजारं, जसे छिन्नी, कोरणी, दाबणी इत्यादी दाखवलेले आहेत. चांदीचा लवचिकपणा; ताणलं व दाबलं जाण्याची, पटकन वितळण्याची आणि त्याच्या पृष्ठभागावर कार्य करण्याच्या क्षमतेमुळे पारंपरिक कारागीर चांदीला प्राधान्य देत असत.

काश्मीर, बर्मा, पुणे, चेन्नई, कच्छ आणि पश्चिम बंगाल ही भारतातील चांदीच्या उत्पादनांच्यी निर्मितीची मुख्य केंद्रं होती.