जहाज
 
सन १९२६

नाकरे

पेटीवर बसवलेल्या ह्या जहाजाच्या प्रतिकृतीचे शीड नाकराचे आणि लहानशा अंगभूत धारकाचे बनलेले आहे. त्याच्यावर एका लहानशा जहाजाचे चित्र रंगविलेले आहे. भारतात अहमदाबाद, सुरत आणि खंबात नाकराच्या अलंकारिक वस्तूंच्या उत्पादनाची मुख्य केंद्रं होती, जिथे केवळ निर्यातीसाठी ह्या वस्तूंची निर्मिती केली जात असे.

नाकरे म्हणजे टणक कवच असलेले कालव; गोगलगाईंसारख्या प्राण्यांच्या शिंपल्याच्या आत तयार होणार हा थर. ह्या नाकऱ्यांमध्ये घडवल्या जाणाऱ्या अलंकारिक वस्तूंना भारतात मुघल राजवटीत राजाश्रय मिळाला. सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियादरम्यानच्या वाढत्या व्यापारामुळे नाकऱ्यात घडवलेल्या वस्तू युरोपच्या बाजारपेठेत लोकप्रिय झाल्या.