ढाल
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
कोफ्तागिरी

चांदी आणि सोन्याच्या तारांच्या जडावकामाने अलंकृत केलेल्या गुंतागुंतीच्या नाजूक नक्षीकामाची ही मुलतानी ढाल संग्रहालयाचा कोफ्तागिरी जडाव कामाचा संचय अधोरेखित करते. अलंकारिक वस्तुंना खास जडाव करण्याची कला आजही राजस्थानातील उदयपूर, जयपूर, अलवार आणि सिरोही, मध्य प्रदेशातील दातिया, दक्षिणेतील त्रिवेंद्रम आणि बिदर आणि काश्मिरात जिवंत आहे.