एस्. एस्. सियाम, मुंबई
१८९७
लाकूड

एस्. एस्. सियाम जहाजाची ही विस्तृत प्रतिकृती औद्योगिक कलादालनात मांडण्यात आलेली आहे. एस्. एस्. सियाम हे पेनिन्सुलार अँड ओरिएंटल स्टीम नॅव्हिगेशन कंपनी ह्या ब्रिटिश जहाज कंपनीच्या मालकीचे होते आणि मध्य पूर्व आणि भारतावरून लंडन ते ऑस्ट्रेलिया मध्ये हे फिरत असे. माझगांवला गलबताची दुरूस्ती करण्याच्या ठिकाणी दुरुस्तीसाठी आलेले असताना एका दयाळ कांजी नामक तरुण प्रशिक्षुने १८९७ साली ह्याची लहानशी प्रतिकृती बनवली. ह्या प्रतिकृतीत एक मोठा बोगदा, दोन नांगर, दोन मोठी शिडं आणि दोन जीवन नौका आहेत. इ. जे. केल ह्या जहाजाच्या मूळ मालकाच्या परिवाराच्या सदस्यांकडून संग्रहालयाला सदर प्रतिकृती भेट मिळाली.