राधा कृष्ण, त्रिवेंद्रम् (आता तिरुवानंतपुरम्)
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत 
हस्तिदंत

भारतातील युरोपच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम म्हणून म्हैसूर आणि त्रिवेंद्रम ही हस्तिदंती कोरीवकामाची प्राथमिक केंद्र बनली. राधा आणि कृष्णाच्या नृत्य करणाऱ्या सदर प्रतिमांमध्ये ब्रिटिशांची नैसर्गिकता किंवा निसर्गाचे वास्तववादी चित्रण रुजवण्याचा प्रयत्न प्रकर्षाने जाणवतो.

उत्तर भारतातील दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, दक्षिण भारतातील म्हैसूर आणि बर्मामधील मौलमें ही भारतातील हस्तिदंती उत्पादनांची मुख्य केन्द्र होती.