पार्वती आणि गणेश, मुंबई  
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
चंदनाचे लाकूड

चंदनाच्या लाकडात घडवलेल्या वस्तूंमध्ये हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा अतिशय लोकप्रिय होत्या. ह्या काळात भारतीय कलेचा प्रबोधन काळातील चित्रभाषेशी असलेला घनिष्ट संबंध पार्वतीच्या त्रिभंग आकृतीत, चेहऱ्यावरच्या भावात आणि तिच्या कपड्याच्या लयदार ओघात दिसून येतो.

महाराष्ट्र आणि दक्षिण भारत ही चंदनाच्या कोरीव कामाची भारतातील प्रमुख केंद्र राहिली.