दीपस्तंभ, रत्नागिरी
१९२२
गव्याचे शिंग

रत्नागिरी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गव्याच्या शिंगापासून विस्तृतपणे कोरलेला हा दीपस्तंभ. येथे नागासारख्या भारतीय अलंकारिक रचना आणि युरोपियन आकाराचे संकलन झाल्याचे पाहायला मिळते. एकोणिसाव्या - विसाव्या शतकांमध्ये उपयुक्तता आणि सौंदर्यात्मक निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालापैकी एक म्हणजे प्राण्यांची शिंगं.

कलात्मक वस्तू बनवण्यासाठी प्रामुख्याने म्हैस आणि गव्याच्या शिंगांचा वापर पूर्वी केला जात असे. आधी हे शिंग नारळाच्या तेलाने ओलसर करून घेतले जाई, मग ते मेणासारखं मऊ होईस्तोवर आगीवर गरम केलं जाई व त्यानंतर शिंगाला हाताने इच्छित आकार दिला जात असे. हे शिंग लाकडाच्या साच्यात ठेऊन त्याला तकाकी आणून त्यावर अलंकारिक नक्षीकाम केले जात असे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सावंतवाडी येथे शिंगांपासून बनवलेल्या अलंकारिक वस्तूंच्या निर्मितीची प्रमुख केंद्रं होती.