किटली, कच्छ
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
चांदी

चांदीत घडवलेल्या अलंकारिक वस्तूंना युरोपच्या बाजारपेठेत विशेष मागणी असे. भारतात विविध प्रदेशात चांदीच्या वस्तू घडवल्या जात, प्रत्येक प्रदेशाच्या भिन्न-भिन्न शैली होत्या. गुजरातमधील कच्छ हे केंद्र मुलाम्यात कोरलेल्या हलक्या उठावाच्या मोहक व विस्तृत फुलांच्या रचनांकरिता प्रसिद्ध होते. सदर किटलीवर ह्याच स्वरुपाचे अलंकरण बघायला मिळते. ह्या किटलीची हत्तीच्या सोंडेसारखी तोटी आणि झाकणावर असलेला छोटा हत्ती, यासारखे भारतीय आकृतिबंध तेव्हा त्यांना मिळत असलेली लोकप्रियता अधोरेखित करतात.