बरणी, भारत
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
चांदीवर मुलामा

मुलामा चढवणे म्हणजे धातूच्या पृष्ठभागावर विविध खनिजे एकत्र करुन रंगीत रचना निर्माण करण्याची कला. ह्या प्रक्रियेत, धातू सर्वप्रथम कोरला जातो, मग त्याला खोली व उठाव देऊन यथायोग्य खोलगट जागा तयार करण्यात येतात, ज्यात पुढे जाऊन रंग जडवले जातात. चांदीच्या मानाने सोन्यावर अधिक रंग ह्या प्रक्रियेने मिळवता येतात, तांबे आणि पितळावर सोन्याहून अधिक रंग मिळवता येतात. भारतात जयपूर आणि काश्मिर ही ह्या कलानिर्मितीची सर्वात महत्त्वाची केंद्रे आहेत.