हस्तिदंताचे कारागीर
सन १९१३-१४
अर्धी भाजलेली टेराकोटा माती, रंगद्रव्यांसहित

संग्रहालयात मातीच्या प्रतिमांचा अद्वितीय संचय आहे ज्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतची मुंबईची माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती दर्शवलेली आहे. ह्या संग्रहात पारंपरिक हस्तकला आणि व्यवसायांचा सराव करणाऱ्या कारागिरांच्या प्रतिमांचा समावेश आहे.

सदर प्रतिमेत पारंपरिक साधनांचा वापर करून हस्तिदंतात वस्तू घडवणारे कारागीर दिसतात. वसाहतकालीन पाश्चिमात्य बाजारपेठांत हस्तिदंतात साकारलेल्या कलावस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. उत्तर भारतातील दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, दक्षिण भारतातील म्हैसूर आणि बर्मामधील मौलमें ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील हस्तिदंती उत्पादनांची मुख्य केंद्रे होती. ह्या केंद्रांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या हस्तिदंती वस्तू आणि आकृतींचा सुरेख संचय संग्रहालयात आहे.