गंजिफा पत्ते
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
लाकडी पेटी, लाखेचा मुलामा असलेले चामडे

गंजिफा किंवा भारतीय पत्त्यांच्या खेळावर लाखेचा मुलामा देऊन अलंकारिक रचना रंगविलेल्या असत. दशावतार, रामायण, मुघल दरबार हे ह्या पत्त्यांवर साकारलेले प्रमुख चित्रविषय असून नंतरच्या काळात युरोपिय पत्त्यांची बांधणी विशेष लोकप्रिय ठरली. सावंतवाडी (महाराष्ट्र), बिष्णुपूर (पश्चिम बंगाल) आणि निर्मल (आंध्र प्रदेश) ही ह्या पत्त्यांची प्रचलित निर्मितीकेंद्रं होती.