फळांचं वाडगं, मद्रास (आता चेन्नई)
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
चांदी

चांदीत घडवलेल्या अलंकारिक वस्तूंना युरोपच्या बाजारपेठेत विशेष मागणी असायची. भारतात विविध प्रदेशांत चांदीच्या वस्तू घडवल्या जात, प्रत्येक प्रदेशाच्या भिन्न-भिन्न शैली होत्या. चेन्नईचं (मद्रासमधील) चांदीच्या फळांचं वाडगं प्रचलित स्वामी शैलीत उत्थित स्वरुपात घडवलेलं आहे, त्यावर विविध भारतीय उप-देवतांच्या प्रतिमा आहेत.