तुष्टा, बिदर
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
जस्त मिश्रित धातूवर चांदीने केलेले जडावाचे काम

दख्खन भागातील बहमनी राजवटीतील बिदर येथे जस्त मिश्रित धातूवर चांदीने केलेल्या जडावाच्या कलेची भरभराट झाली. पर्शियन व अरेबिक शैलीतील जडावाच्या कारीगीरी आणि रचनांवरुन प्रभावित बिदरीकामास भारतीय समाजात उच्चं दर्जाचं स्थान होतं, आणि तुष्टा विशेषकरून खानदानी लोक वापरत असत. खसखशीच्या फुलाच्या आकृतिबंधानी ल्यालेला हा तुष्टा, अर्थात हात-तोंड धुण्याचं पात्रं, जाळीदार झाकणाने सजवलेले आहे. १९४० साली प्रसिद्ध कला संग्राहक पुरषोत्तम माओजी ह्यांच्याकडून संपादित केलेल्या बिदरी संग्रहातील ही एक कलावस्तू आहे.