ड्रॅगन दीपस्तंभ, नेपाळ  
पितळ

सदर दीपस्तंभ हा त्या अलंकारिक कलावस्तूंचे उदाहरण आहे ज्या एकोणिसाव्या शतकात भूमार्ग आणि समुद्री व्यापार विस्तारित झाल्यावर आशियातून युरोपात निर्यात केल्या जात होत्या. नेपाळच्या ह्या ड्रॅगनला पंख आहेत, भावपूर्ण रौद्र चेहरा आहे, अतिशय अलंकारिक शेपूट आहे आणि मेणबत्ती ठेवायला जागा आहे जी तो पुढच्या उजव्या पायावर तोलतोय.