थाळी, आग्रा
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत 
पाषाण (सोपस्टोन)

आग्र्याच्या ह्या थाळीवर केलेल्या अतिशय बारीक कोरीवकामात इस्लामी भौमितिक आकार आणि युरोपातील फुलापानांच्या आकृतिबंधांचा मिलाफ झालेला दिसतो. सोपस्टोन, ज्याला संभव असंही म्हणतात, हा एक प्रकारचा रूपांतरित पाषाण आहे, पाषाणाचा हा प्रकार त्याच्या आत्यंतिक मऊपणासाठी प्रचलित असून ह्याच्यावर खूप बारीक रचना आणि कारागिरी करता येते. ह्या प्रकारच्या कारागिरीसाठी आग्रा अग्रणीय केंद्र आहे; इथे पाषाण कोरणारे कारागीर आहेत जे संगमरवरी दगडात जडावाचे काम करतात, हे शहर येथील कारागीरीकरता नावाजलेले आहे.