वाडगं
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
कागदाचा लगदयापासून बनविलेले (पेपर-मॅशे)

गडद लाल रंगावर सोनेरी पक्षी व चिनार वृक्षाच्या पानाच्या आकृतिबंधाने अलंकारिक हे वाडगं संग्रहालयाच्या नितांत सुंदर काश्मिरी पेपर-मॅशे संग्रहाचा मानबिंदू आहे.

पेपर-मॅशे म्हणजे कागदाचे तुकडे वा लगद्याला इच्छित आकाराच्या साच्यात घडवून, चिकटवून, पक्कं करण्याची प्रक्रिया. अलंकरणाच्या ह्या नाजूक कलेचा परिचय पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात काश्मिरला मध्य आशियातील समरखंद येथे करून देण्यात आला. काश्मीरच्या पेपर-मशे बनवण्याच्या शैलीत कागदाचा पूर्ण लगदा केला जात नाही. कागद पाण्यात मऊ करून साच्यात एक एक थर देत चिकटवून इच्छित जाडी/घनता मिळवण्यात येते.