अर्धनारेश्वर, दक्षिण भारत
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
कांस्य

अर्धनारेश्वराचे द्विलिंगी रूप हे देवांमधील स्त्री व पुरुष शक्तींच्या सार्वभौमतेचे प्रतीक आहे. कांस्यात घडवलेली ही मूर्ती भारतीय शिल्पकारांचे कौशल्य दर्शवते. कांस्य हा तांबं, कथील आणि जस्त धातूंच्या मिश्रणातून तयार होतो, जास्त काळ टिकत असल्याने शिल्पकार ह्याचा प्राधान्याने उपयोग करतात.